Top News

राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘होम मिनिस्टर’ शर्मिला ठाकरे सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे सकाळी पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात करतील.

शर्मिला ठाकरे दुपारच्या सुमारास सांगलीतल्या पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत. मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांचीही त्या भेट घेणार आहेत.

सांगली दौऱ्यानंतर त्या कोल्हापूरला जाणार आहेत. महापुरात सापडलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरग्रस्तांची भेट त्या संध्याकाळी घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करुन त्या मदत करणार आहेत.

दरम्यान, मनसेच्या अनेक शाखांकडून मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा???”

पूरग्रस्तांच्या मदतीला उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत!

-पूरग्रस्तांच्या मदतीला क्रिकेटचा ‘देव’ धावला! इतरांनाही मदत करण्याचं आवाहन

-“तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

-चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या