मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर करण्यात आलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्माने मागं घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, “रेणू शर्मांनी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सत्यता पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळं आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता”.
दरम्यान, रेणू शर्मानं मुंडेविरोधातील तक्रार मागं घेतं, यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रही मुंबई पोलिसांना दिलं आहे. त्यात तिने, मी केलेली तक्रार काही कारणास्तव मागं घेत आहे, असं लिहिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!
वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तीन महिन्यांचा कारावास!
“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”
सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर