बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही”

लखनऊ | जागतिक लोकसंख्या दिनाच्या औचित्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण 2021-30 जाहीर केलं. या विधेयकाच्या प्रारूपानुसार यामध्ये दोनपेक्षा अधिक मुले झाल्यास सरकारी नोकरीपासून ते स्थानिक निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यापर्यंतच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारी योजनांचा लाभ न देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या विषयावर वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र वाढती लोकसंख्या विकासामध्ये अडचण निर्माण करू शकते. उत्तर प्रदेश राज्य विधी आयोग उत्तर प्रदेश राज्याच्या लोकसंख्येच्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याणाबाबत काम करत आहे, असं योगींनी सांगितलं. सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी टीका केली आहे.

कायदा बनवणं हे सरकारच्या हातात आहे. मात्र जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा त्याला कोण अडवू शकतो?, असा सवाल शफीकुर्रहमान बर्क यांनी विचारला आहे.

जिथपर्यंत योगी, मोदी आणि मोहन भागवत यांच्या प्रश्न आहे, तर यांना मुलंच नाही आहेत. त्यांनी लग्नच केलेलं नाही. आता सांगा संपूर्ण देशालाच मुलं जन्माला घालू देणार नसाल तर उद्या कुठल्या अन्य देशाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यावर लोक कुठून आणणार, असं म्हणत शफीकुर्रहमान बर्क यांनी योगी, मोदी आणि मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही- राहुल गांधी

शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More