बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-कोलकाता सामन्यात असं काय झालं की, शाहरूख खानला मागावी लागली माफी !

चेन्नई | मुंबई इंडियन्सने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर आपल्या दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवला.कोलकाता सामना आरामात जिंकेल अशी चिन्हे होती. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना कोलकाताच्या फलंदाजांना केवळ 4 धावा करत्या आल्या. त्यामुळे मुंबईने हा निसटता सामना जिंकला. कोलकाताच्या या खराब कामगिरीमुळे कोलकाताचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.

आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. 156 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर नितीश राणानं पुन्हा एकदा चांगली खेळी करत सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं. पण  त्यानंतर संघातील कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. अखेर कोलकाताला जिंकण्यासाठी केवळ 30 चेंडूत 32 धावांची गरज होती.

नितीश राणा बाद झाल्यानंतर माॅर्गन, दिनेश कार्तिक, आणि संघाचा धुरंदर फलंदाज आँद्रे रसल यांना देखील काही करता आलं नाही. अखेरच्या काही षटकात कोलकाताच्या फलंदाजांनी हत्यार टाकून दिलं. बुमराह आणि बोल्टच्या जोडीनं चांगली गोलंदाजी करत सामना वळवला. अखेरच्या षटकात गरजेच्या असलेल्या 15 धावा देखील करता आल्या नाही. त्यामुळे कोलकाताचे समर्थक संघाची कामगिरी पाहून नाराज झाले आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याने ट्विट करत चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.

दरम्यान, या विजयाबरोबरच मुंबईने या आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. तर आतापर्यंत कोलकाताचा एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! भररस्त्यात सोनसाखळी चोराने आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेलं

उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे धावले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; समोर आलीय ही धक्कादायक माहिती

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 103 टक्के पाऊस होणार!

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More