Shah Rukh Khan | बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. इतकंच नाही तर, अभिनेता उपचारासाठी थेट अमेरिकाला जाणार असल्याचं देखील म्हटलं जातंय.त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त शाहरुख खानची चर्चा रंगली आहे.
अभिनेता डोळ्यांच्या उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे भीतीचं आणि काळजी करण्याचं काही कारण नाही, असं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काही गोष्टी ठरल्यानुसार न झाल्यामुळे शाहरुखने परदेशी उपचार घेण्याचं ठरवलं आहे.
Shah Rukh Khan उपचारासाठी जाणार परदेशात
काही मीडिया रिपोर्टनुसार, काल 29 जुलैरोजी शाहरुख खान मुंबईतील एका रुग्णालयात गेला होता. मात्र, उपचार ठरल्याप्रमाणे न झाल्यामुळे तो आता परदेशी उपचार घेणार आहे. यासाठी किंग खान थेट अमेरिकाला जाणार आहे. त्यामुळे सध्या शाहरुख खान चर्चेत आला आहे.
शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास त्याने सध्या ब्रेक घेतला आहे. . गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्याचा ‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याआधी शाहरुख ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमात दिसून आला होता. त्याने अशा 3 चित्रपटांसाठी काम केलं आहे. सध्या तो ब्रेकवर आहे.
Shah Rukh Khan आगामी चित्रपट
याबाबत शाहरुखने स्वतः प्रतिक्रिया देखील दिली होती. “मला वाटलं होतं की, मी जरा आराम करायला पाहिजे. मी 3 सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमात अनेक सीनमध्ये शारीरिक काम होते. त्यामुळे मी टीमला सांगून ठेवलं होतं की मी मॅच पाहायला जाणार आहे आणि शुटिंग जुलै किंवा ऑगस्टमध्ये करुत.”
शाहरुखचा आगामी सिनेमा हा ‘किंग’ असणार आहे. यामध्ये शाहरुख पहिल्यांचा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.त्यामुळे चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
News Title – Shah rukh khan health update
महत्त्वाच्या बातम्या-
रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड
“एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल
“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
मोठी बातमी! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तातडीने पार पडली शस्त्रक्रिया; नेमकं झालं काय?