Shah Rukh Khan | अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) बहुचर्चित “मन्नत” (Mannat) बंगल्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्य सरकार (State Government) शाहरुख खानची (Shah Rukh Khan) ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी मान्य करण्याची शक्यता आहे. या याचिकेमध्ये, मुंबई उपनगर (Mumbai Suburban) जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) घर “मन्नत” (Mannat) उभारलेल्या जमिनीसाठी (Land) आकारण्यात आलेले अतिरिक्त पैसे (Extra Money) परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्या नावावर बांद्रा पश्चिम (Bandra West) येथील बँडस्टँड (Bandstand) येथे असलेला हा बंगला (Bungalow) मूळतः राज्य सरकारने (State Government) पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर (Lease) दिलेल्या जमिनीवर (Land) बांधण्यात आला आहे.
पार्श्वभूमी आणि अतिरिक्त पैशांचा दावा
राज्य सरकारने (State Government) संबंधित जमिनीच्या (Land) भाडेतत्त्वाच्या (Lease) कराराला (Agreement) मंजुरी दिल्यानंतर, मूळ मालकाने ती जमीन (Land) शाहरुख खानला (Shah Rukh Khan) विकली. यानंतर शाहरुख (Shah Rukh) आणि गौरीने (Gauri) “मन्नत” (Mannat) असलेल्या जागेसाठी पैसे दिले.
आता शाहरुख (Shah Rukh) आणि गौरीने (Gauri) दिलेल्या या अतिरिक्त पैशांची (Extra Money) परतफेड करण्याची मागणी केली आहे. २४४६ स्क्वेअर मीटरमध्ये (Square Meter) पसरलेल्या या बंगल्याची (Bungalow) नोंदणी शाहरुख (Shah Rukh) आणि गौरीच्या (Gauri) नावावर आहे. त्यांनी राज्य सरकारच्या (State Government) धोरणाचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत आधीच्या मालकाकडून भाडेतत्त्वावरील (Lease) जमिनीचा मालकी हक्क (Ownership Rights) विकत घेता येतो.
चूक आणि पैसे परत करण्याची मागणी
गौरी (Gauri) आणि शाहरुखने (Shah Rukh Khan) मार्च २०१९ मध्ये रेडी रेकनर (Ready Reckoner) किमतीच्या २५ टक्के रक्कम भरली होती, जी २७.५० कोटी रुपये इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, नंतर शाहरुख-गौरीला (Shah Rukh-Gauri) कळले की, राज्य सरकारने (State Government) अनवधानाने चूक करत जमिनीच्या (Land) तुकड्याऐवजी बंगल्याची (Bungalow) किंमत गृहीत धरून ‘कन्वर्जन फी’ (Conversion Fee) आकारली होती.
सप्टेंबर २०२२ मध्ये ही चूक खान कुटुंबाच्या लक्षात आली आणि गौरी खानने (Gauri Khan) जिल्हाधिकारी, एमएसडी (MSD) यांना पत्र लिहून अतिरिक्त पैसे (Extra Money) परत करण्याची मागणी केली. ही रक्कम अंदाजे ९ कोटी रुपये इतकी आहे.
Title : Shah Rukh Khan Likely to Get Refund of 9 Crore in Mannat Bungalow Case