Shah Rukh Khan | काल 26 मे रोजी ‘कोलकाता नाइट रायडर्स’संघाने हैद्राबादला नमवत आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. बॉलीवुडचा किंग खान या संघाचा मालक आहे. शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासह हा सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. कोलकाता बाजी जिंकताच संपूर्ण खान कुटुंब भावुक झाल्याचं दिसून आलं.
शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर, जगभरात चाहते आहेत.त्याला आतापर्यंत 14 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात शाहरुखच्या एकूण संपत्तीबद्दल जोरदार चर्चा होतेय.
KKR चा मालक शाहरुख दिवसाला किती कमावतो?
शाहरुखची (Shah Rukh Khan ) एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. कमाईच्या बाबतीत हॉलिवूड स्टार टॉम क्रूझलाही शाहरुख टक्कर देतो. काही मीडिया रिपोर्टनुसार शाहरुखची नेटवर्थ गेल्या एक दशकात 300 टक्क्यांनी वाढली आहे.
किंग खान चित्रपट, जाहिरात आणि उद्योगाच्या माध्यमातून प्रचंड कमाई करतो.नेटवर्थच्या बाबतीत तो सलमान खान आणि आमिर खान यांनाही मागे टाकतो. आता त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आलाय. त्याची दिवसाची कमाई वाचून तुम्हाला धक्काच बसेल.
शाहरुख खानची नेटवर्थ किती?
भारतीय चलनानुसार शाहरुख खानची (Shah Rukh Khan ) संपत्ती 6,324 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एका चित्रपटासाठी तो साधारण 100 ते 150 कोटी रुपयांचं मानधन घेतो. मात्र, काही चित्रपट त्याने मोफत केलेले आहेत. शाहरुखकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे. यासोबतच बिझनेस , चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातूनही तो चांगलीच कमाई करतो.
पाहायला गेलं तर किंग खान दिवसाला 10 कोटींपेक्षा अधिक कमाई करतो. मुंबईमधील त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याची किंमतच 200 कोटींच्या घरात आहे. इतकंच नाही तर, लंडन आणि दुबईत त्याचा एक व्हिला देखील आहे. अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे. 2023 मध्ये शाहरुखचे चित्रपट देखील चांगलेच गाजले. यात जवान, डंकी,पठाण या चित्रपटांचा समावेश आहे.
News Title – Shah Rukh Khan Net Worth
महत्त्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर
मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा
कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक
हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?
केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले