सैफनंतर शाहरुख खान टार्गेटवर?; ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना संशय

Shahrukh Khan l बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याच्या (Attack) घटनेने देशभरात खळबळ उडाली असतानाच, तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सैफवरील हल्ल्यापूर्वी (Attack) अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हल्लेखोरांच्या टार्गेटवर (Target) असल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या घराची रेकी (Reiki) करण्यात आली होती आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) देखील समोर आला आहे.

शाहरुखच्या घराची रेकी :

सैफ अली खानवर हल्ला होण्यापूर्वी, याच व्यक्तीने दोन-तीन दिवस आधीच शाहरुखच्या घराची रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. १४ जानेवारीला शाहरुखच्या घराची रेकी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीला शाहरुख खानच्या ‘मन्नत’ (Mannat) बंगल्याबाहेर रेकी करताना पाहिले गेले होते.

असा रचला होता कट

‘मन्नत’च्या जवळ असलेल्या ‘रिट्रीट हाऊस’ (Retreat House) जवळ एक मोठी लोखंडी सीडी (Iron Ladder) लावून हा अज्ञात व्यक्ती ‘मन्नत’मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत होता. सहा फूट आठ इंच लांबीच्या या सीडीवरून तो वर चढला होता. मात्र, सुरक्षा व्यवस्था (Security) कडक असल्यामुळे तो आत प्रवेश करू शकला नाही.

Shahrukh Khan l व्हिडिओमधून धक्कादायक खुलासे :

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सैफवरील हल्ल्यापूर्वी शाहरुख खानला टार्गेट करण्याचा कट होता का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, लवकरच सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.

News Title: Shah Rukh Khan was the target before Saif Ali Khan attack?

महत्वाच्या बातम्या-

भाजप आमदाराला पुत्रशोक, लेकाच्या अचानक मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मोठी बातमी! आधी सरपंच आता आणखी एक संशयास्पद मृत्यू, बीडमध्ये खळबळ

Demat Account वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, ‘हा’ नवा नियम वाचाच

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ खायलाच हवेत

हल्ल्यानंतरही धाडसी सैफने दाखवलं शौर्य, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती