“नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष”
मुंबई | नाना पटोले (Nana Patole) म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी कर्नाटकाच्या सभेत केला होता. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
फडणवीस मी पुन्हा येईल म्हणाले होते. त्यानुसार ते परत आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून परत येईल असं ते म्हणाले नव्हते. लबाड बोलू नका, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.
संजय राऊत चार महिने झाले असचं म्हणत आहे. रोज सकाळी तेच बोलत असतात. एकदा ते जोरदार आपटतील. तेव्हा त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.