सत्ताधारी आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Shahaji Bapu Patil | राज्यात तसंच देशात सध्या लोकसभा निवडणुकीची हवा आहे. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी सभांचे सत्र सुरू झाले आहे. नुकताच अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा झाला. यात महायुतीमधील जागावाटप संदर्भात चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. तर सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराने (Shahaji Bapu Patil) केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधील महत्वपूर्ण पक्ष आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील जागा वाटप बाबत सतत चर्चा होत आहे. अशातच उद्धव ठाकरे मविआचा हाथ सोडून पुन्हा भाजपच्या वाटेवर येणार असल्याचा दावाच शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे.

2019 मध्ये लोकसभा एकत्र लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर फारकत झाली. उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून वेगळं होत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हाथ धरला. यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सत्तेत होते.

मोदी-ठाकरे एकत्र येणार?

मात्र, अडीच वर्षांतच मविआचं सरकार कोसळलं. शिवसेनेमध्ये उभी फूट पडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. यामुळे मविआ सरकार पडलं. हे होत नाही तोच 2023 मध्ये मे महिन्यामध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली. आता राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले आहेत.

अजित पवार भाजप आणि शिंदे सोबत सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता लवकरच लोकसभा निवडणुकांचा डंका वाजणार आहे. त्यापुर्वीच शिंदे गटाच्या आमदाराने एक मोठा दावा केला आहे. हा आमदार दूसरा-तिसरा कुणी नसून ‘काय झाडी, काय डोंगार काय हाटेल.. ओके मध्ये आहे सगळं’ फेम शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) आहेत.

शहाजी बापू पाटील यांचा दावा

“101% खात्री करून सांगतो की, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत. आपला अंदाज चुकणार नाही. फक्त दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही,” असं शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) एका मुलाखतीत म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

News Title-  Shahaji Bapu Patil claims that Modi-Thakrey will come together

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी