मुंबई | शिवसेनेत बंड करुन 40 आमदार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला सैर करुन आले. तिथून महाराष्ट्राच्या राजकारणाची गणिते हालवत त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यावेळी गुवाहाटीतील हॉटेलचे वर्णन करताना सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल हा डायलॉग लोकप्रिय झाला. आता त्यांच्यावर मुंबईतील आमदार निवासात मोठे संकट कोसळले.
आमदार निवासातील शहाजी बापू पाटलांच्या खोलीतील छत आचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शहाजी बापू थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे पाटलांवर आता काय आमदार निवास, काय खोली, काय छत म्हणायची वेळ आली आहे.
बुधवारी आमदार निवासात शहाजी बापूंच्या खोलीतील छताचा भाग कोसळल्याने खळबळ उडाली. त्यावेळी शहाजी पाटील खोलीतच होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत खोलीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे आता पाटलांना पर्यायी व्यवस्था दिली आहे.
सांगोल्याचे बंडखोर आमदार शिंदे गटासोबत गुवाहाटी मुक्कामी असताना आपल्या एका कार्यकर्त्याला संपर्क करुन तेथील माहिती देताना, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल असा डायलॉग बोलले होते. त्यानंतर त्यांचा हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात इतका लोकप्रिय झाला की, त्यांना महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यांच्या ह्या डायलॉगवर लोकगीत सुद्धा आले आहे.
थोडक्यात बातम्या –
काय ते झाडी, काय ते डोंगर; पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्यातील ‘या’ जागा एकदम ओक्के
‘मी एक दिवस कपडेच घालणार नाही म्हणजे…’, उर्फी जावेदच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ
कोरोनाच्या ‘या’ दिर्घकाळ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?
बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ
Comments are closed.