बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपले. गेला आठवडाभर हे सत्तानाट्य सुरु होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल यांनी बोलावलेल्या बहुमत चाचणी विशेष आधिवेशनाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत 30 जून रोजीच बहुमत चाचणी अधिवेशन होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडलं.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या 39 आमदारांनी भारतील जनता पक्षाला पाठींबा देत सरकार स्थापन केलं. गुरुवारी या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री झाले. यावर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

पाटील म्हणाले, माझ्या राजकीय अनुभवातून लोकशाहीच्या इतिहासात जी राज्य चाललेली आहेत, त्या देशांंमध्ये असे कोणतेही उदाहरण घडलेले नाही. हे एक ऐतिहासिक उदाहरण आहे. तसेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार आहेत, हे कुणालाच माहित नव्हतं, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंनाच माहित होतं की नाही याची मला शंका आहे. शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, म्हटल्यावर पीएने मला उठवले. मा दणादणा गादीवर उड्या मारल्या. पांडुरंगाच्या पाया पडलो, तुळजाभवानीच्या पाया पडलो, स्वामी समर्थांच्या पाया पडलो की या राज्याला किती दिवसांनी सोन्यासारखा मुख्यमंत्री मिळाला, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी अत्यानंद झाल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

‘मी एकनाथ संभाजी शिंदे, शपथ घेतो की….’; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”

फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More