बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला’; शिवसेना आमदाराची टीका

सोलापूर | उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तीव्र विरोध केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

उजनी धरणातील पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा रक्तरंजित आंदोलन सुरू होईल, असा इशारा शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला, असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे.

उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं, अशी टीका शहाजी पाटील यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना बलात्कार

“क्रिकेटपेक्षा शेतीच बरी, टीममध्ये कोचला महत्व नाही”

“वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतकं मनावर घेतलं आहे की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More