Shahajibapu Patil | ‘काय झाडी, काय डोंगर..’ फेम शहाजीबापू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेत जेव्हा बंड झालं तेव्हा शहाजीबापू देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यांचं गुवाहाटीतील काय झाडी, काय डोंगर, हे विधान तेव्हा चांगलंच गाजलं होतं. मात्र, सांगोला मधील मतदारांनी निवडणुकीत त्यांना चांगलाच धक्का दिला. येथे शेतकरी-कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला. (Shahajibapu Patil )
पराभव झाल्यानंतर शहाजीबापू यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे. यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. पराभव झाला असला तरी शहाजीबापू हे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यांनी पंढरपूर परिसरात जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार, असं म्हटलं.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
इतकंच नाही तर, निवडणुकीत पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असं विधान शहाजीबापू यांनी केलंय. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं. याच बैठकीत त्यांनी हे विधान केलंय.
यंदाची निवडणूक ही भावनिक मुद्यावर लढली गेली, असंही ते म्हणाले. दोन वर्षात 5 हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे , असं म्हणत शहाजीबापू यांनी दीपक आबा आणि देशमुख यांना टार्गेट केलं. (Shahajibapu Patil )
“आमदारकीपेक्षा काहीतरी मोठं आणतो..”
उद्धव ठाकरे आणि भोंगा संजय राऊत इथे काय त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते असंही शहाजीबापू म्हणाले. पराभवाने खचू नका…माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठे कायतर घेऊन येऊन दाखवतो, असं शहाजीबापू म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची एकच चर्चा रंगत आहे. आता शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याबाबत बोललं जातंय. (Shahajibapu Patil )
News Title : Shahajibapu Patil big announcement
महत्वाच्या बातम्या –
आधी डिलीट केलं ट्विट, आता म्हणतात बाबा तुमचा अभिमान वाटतो!
मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट उसळणार, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा
“मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेऊन माझे बाबा..”; श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत
आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!