बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहीन बागेतील आंदोलक कायमस्वरूपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

न्यायालयानं सरकारला आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले नाहीत. मात्र शाहीन बागेतील आंदोलक कायमस्वरूपी अशा प्रकारे रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी 17 फ्रेब्रुवारीला होईल. इतके दिवस प्रतीक्षा केलीच आहे तर आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी, असं न्यायमूर्तींनी सुनावणीची पुढील तारीख देताना म्हटलं.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर शाहीन बागेसंबंधीच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायालयानं म्हटलं होतं. शाहीन बागेतल्या आंदोलकांना हटवण्यात यावं, अशी मागणी अनेक याचिकांमधून करण्यात आली.

ट्रेंडिंग बातम्या- 

ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस

पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख

महत्वाच्या बातम्या- 

पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक

ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी

कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More