Top News खेळ

शाहिद आफ्रिदीला पुन्हा चढली झिंग; सचिन तेंडुलकरच्या लागतोय नादी!

भारत-पाकिस्तान हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. युद्धभूमीवर जसं वातावरण असतं, तसंच वातावरण या दोन्ही देशांच्या क्रिकेट सामन्यावेळी असतं. भारताने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला अनेकदा चितपट केलं आहे, मात्र पाकिस्तानी खेळाडू खेळात कमी आणि इतर गोष्टींकडेच जास्त लक्ष देतात. सराव करुन बाजी मारण्यापेक्षा भारतीय खेळाडूंच्या कुरापती करण्याकडेच त्यांचा जास्त कल असलेला दिसतो.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी अशा कुरापती करणाऱ्या खेळाडूंपैकी एक, मैदानावर तर तो भारतीय क्रिकेटपटूंना हिणवत असेच, मात्र आता मैदानाबाहेर देखील त्याची ही सवय गेलेली दिसत नाही. अनेक वेळा त्यानं भारतीय क्रिकेटपटूंना छेडण्याचं काम केलं आहे आणि भारतीय क्रिकेटपटूंनी देखील त्याला प्रत्येक वेळी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र एवढं होऊनही त्याची हौस काही मिटायचं नाव घेत नाहीये.

शाहीद आफ्रिदी आता क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नादी लागला आहे. शोएब अख्तरच्या समोर सचिन तेंडुलकर थरथर कापत असे, असं आफ्रिदीनं म्हटलं आहे.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, कारण ही काही खास गोष्ट नाही, मात्र ९ वर्षांपूर्वी आफ्रिदीचं एक पुस्तक बाजारात आलं होतं. ते किती विकलं गेलं हे त्याचं त्यालाच माहिती मात्र त्या पुस्तकात त्याने सचिनबद्दल गरळ ओकली होती.

आफ्रिदी आपल्या पुस्तकात म्हणाला होता की सचिन तेंडुलकर शोएब अख्तरला घाबरत असे. शोएबपुढे सचिनला खेळता येत नसे. त्यावेळी देखील त्याच्या या वक्तव्यानंतर भारतीय खेळाडू तसेच फॅन्सनी त्याचा समाचार घेतला होता, मात्र पुन्हा एकदा आफ्रिदीने तशाच प्रकारची वाक्य बोलायला सुरुवात केली आहे.

शाहिद आफ्रिदी एका यूट्यूब चॅट दरम्यान म्हणाला होता की, ‘पाहा, सचिन तेंडुलकर स्वतःच्या तोंडाने नाही सांगणार की मी घाबरत होतो म्हणून, मात्र अख्तरचे असे काही स्पेल्स आहेत की ज्यामध्ये तेंडुलकरच नाही तर जगातील सर्व सर्वोत्कृष्ट फलंदाज हादरले आहेत.

शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही मिड-ऑफवर किंवा कव्हर्सवर फिल्डिंग करता तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. फलंदाजाची बॉडी लँग्वेज तुम्हाला फार काही सांगून जाते. शोएबनं असे काही स्पेल टाकले आहेत ज्यामुळे सचिन बॅकफूटवर गेला आहे.

शाहीद आफ्रिदी म्हणतो, की सचिन फक्त शोएब अख्तरलाच घाबरत नव्हता तर पाकिस्तानचा गोलंदाज सईद अजमलला देखील तो घाबरत होता. शोएबची गोलंदाजी तर एवढी धारदार होती की सचिनचे पाय लटलट कापत असत.

आफ्रिदीने २०११ सालच्या वर्ल्डकपचा उल्लेख केला आहे. सईद अजमल त्यावेळी भारी होता. तेव्हा सचिन तेंडुलकर त्याला घाबरत होता. अनेकदा असं होतं. बऱ्याचदा खेळाडूंवर दबाव असतो त्यामुळे त्यांना समोरच्या गोलंदाजाची भीती वाटणं योग्य आहे, असं आफ्रिदी म्हणाला.

दरम्यान, आफ्रिदी फक्त बोलण्यात माहीर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मोठ्या पराभवांचं तोंड पहायला लागलं आहे. भारतानेच त्यांना कित्येकदा पराभूत केलं आहे. आता तर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा सर्वात वाईट काळ सुरु आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली- राहुल गांधी

‘मातोश्री’च्या आदेशानंतर पारनेरमधील ‘त्या’ नगरसेवकांची घरवापसी

महत्वाच्या बातम्या-

…त्यांचंच हसू झालं; शिवसेनेच्या माजी आमदारानं उडवली राष्ट्रवादीची खिल्ली!

स्थलांतरित मजुरांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मंगळवारी मुंबईत कमी रूग्ण आढळले पण …., फडणवीसांनी केले ‘हे’ प्रश्न उपस्थित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या