बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियतीने घात केला अन् हिमालयाएवढ्या उंचीचा, कैलास भारत पवार गेला…

बुलडाणा | “देश हा देव असे माझा” या एकाच भावनेने आपला प्रत्येक जवान देशसेवा करत असतो. भारत-पाक सीमा, भारत-चीन सीमा, हिमालयाच्या कुशीत असणारी आपली इंच-इंच जमीन यांचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणं हेच त्यांचं एकमेव लक्ष्य असतं. हे करत असताना ते शत्रुच्या मनात धडकी भरवणारं शौर्य गाजवतात. अंगातील रक्त गोठवणारी थंडी, भयानक जंगल, बर्फाने आच्छादलेला डोंगर यांना लिलया पार करतात. हाच आदर्श विचार जगणारा भारतीय लष्कराचा जवान कैलास भारत पवार हा सुट्टीला निघाला असताना बर्फावरून कोसळुन मृत पावला आहे.

महाराष्ट्राचा वाघ, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील पुंडलीक नगर भागातील रहिवासी असलेला भारतीय सैन्यदलात महार बटालियनमध्ये कार्यरत असणारा कैलास पवार हा जवान 2 ऑगस्ट 2020 पासुन सियाचीन या दुर्गम भागात कर्तव्यावर होता. 1 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या कर्तव्याचे एक वर्ष संपवुन आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाला असताना, बर्फाच्छादीत डोंगरावरून पाय घसरला अन् होत्याचं नव्हतं झालं. त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्यांना लडाखच्या रूग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

ते डोळे ज्यांना तब्बल 1 वर्षानंतर आपला लाडका कैलास दिसणार होता. त्या आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-सखे यांच्या डोळ्यात न सामावणारं दु:ख आहे. कित्येकांचा आदर्श असणारा आदर्श कैलास आज अजरामर झालाय, पाठीमागे सोडुन जातोय आपल्या आठवणी, आपलं शौर्य अन् पुढील येणाऱ्या पिढीसाठी देशसेवेचा वारसा.

चिखली येथील तालुका क्रिडा संकुलात दि.4 ऑगस्ट रोजी लष्करी इतमामात जवान कैलास पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी आई-वडील, मोठा भाऊ, व धाकटी बहीण हा परिवार आहे.

थोडक्यात बातम्या

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More