Shahid Kapoor | येत्या ३१ जानेवारीला बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘देवा’ (Deva) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहिदने अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्याच्या एका मुलाखतीची क्लिप (Clip) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. यात त्याने त्याच्या आयुष्यातील अशा एका वेळेबद्दल सांगितले जेव्हा त्याला कमी लेखण्यात आले होते. राज शमानीच्या पॉडकास्टवर (Raj Shamani Podcast) शाहिदला विचारण्यात आले की, असा कोणता प्रसंग होता जेव्हा तुला अपयशी (Failure) वाटले? यावर शाहिदने उत्तर दिले,
“‘कबीर सिंह’ (Kabir Singh) पूर्वी माझ्यासोबत असे झाले होते. मी कोणत्याही एका घटनेबद्दल बोलणार नाही, पण मला असे वाटायचे की मी कमी आहे. मला तसे जाणवून दिले गेले. कोणीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. पण एक कलाकार (Artist) म्हणून, एक स्टार (Star) म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला अशा परिस्थितीत टाकण्यात आले की मला कमीपणाची भावना जाणवू लागली. आणि मी हे कधीही मान्य करणार नाही.” शाहिदने मुलाखतीत कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु सोशल मीडियावर लोक असा अंदाज लावत आहेत की तो ‘पद्मावत’ (Padmaavat) चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलत आहे.
‘पद्मावत’ चित्रपटात साईडलाईन केल्याची चर्चा
सोशल मीडियावर अशी चर्चा रंगू लागली आहे की, रणवीर (Ranveer) आणि दीपिकाच्या (Deepika) पीआर टीमने (PR Team) चित्रपटाला हायजॅक (Hijack) केले होते. शाहिद चित्रपटातील महत्त्वाचा (Important) भाग होता, पण त्याला पूर्णपणे साईडलाईन (Sideline) करण्यात आले होते. मात्र, चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने असे विधान केलेले नाही. चाहते अशाप्रकारच्या चर्चा करत असतात.
‘पद्मावत’मध्ये शाहिदने राजा रतन सिंहची (Raja Ratan Singh) भूमिका साकारली होती. एका जुन्या मुलाखतीत त्याने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले होते की, “मी स्वतःला त्या भूमिकेत पसंत करत नाही. मी त्या भूमिकेला एकाच पद्धतीने साकारले. ती भूमिका एक्सप्लोरच (Explore) केली नाही. माझ्या डोक्यात एकाच प्रकारे ती भूमिका राहिली. कदाचित इतर लोकांना मी त्या भूमिकेत आवडलो असेन, पण मी स्वतःला त्या भूमिकेत पसंत करत नाही.” (Shahid Kapoor)
‘पद्मावत’च्या सेटवर वाटायचे ‘आऊटसायडर’
शाहिद कपूरने (Shahid Kapoor) एका मुलाखतीत असेही म्हटले होते की ‘पद्मावत’च्या सेटवर त्याला ‘आऊटसायडर’ (Outsider) वाटायचे. एका मुलाखतीत शाहिदने म्हटले होते, “मी प्रत्येक चित्रपटात माझ्या चित्रपट निर्मात्यांचा आवडता राहिलो आहे. पण पहिल्यांदाच मला आऊटसायडर असल्यासारखे वाटले. जेव्हा तुम्ही संपूर्ण टीमसोबत काम करता, तेव्हा तुम्हाला एकत्रित काम करावे लागते. तेव्हा तुम्हाला तशी भावना येतेच कारण सगळे मिळून एकसाथ पुढे जात असतात.”
‘पद्मावत’नंतर शाहिदचा ‘कबीर सिंह’ हा मोठा चित्रपट होता. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात २७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हा शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट आहे.
Title: shahid kapoor felt inferior before kabir singh opens up about padmaavat experience