सैफ अली खानवरील हल्ल्यावर करिनाच्या EX बॉयफ्रेंडची मोठी प्रतिक्रिया

Shahid Kapoor | अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने बॉलिवूडसह देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच, सैफची पत्नी करीना कपूरचा पूर्वाश्रमीचा प्रियकर शाहिद कपूरनेही (Shahid Kapoor) या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

“सैफच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतोय”

शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘देवा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी पत्रकारांनी शाहिदला सैफवरील हल्ल्याबाबत विचारले असता तो म्हणाला, “ही एक दुःखद घटना आहे. आम्ही सगळेच सैफच्या काळजीत आहोत. त्याच्यासोबत जे घडले ते ऐकून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सैफ लवकरात लवकर बरा होईल, त्याला चांगले वाटेल अशी मी आशा करतो.”

“मुंबई हे खूपच सुरक्षित शहर आहे”

शाहिद पुढे म्हणाला, “अशा प्रकारची घटना मुंबईत घडणं अशक्यच आहे. मला विश्वास आहे की पोलिस या प्रकरणाचा नक्कीच तपास करतील. मुंबईत असे घडत नाही. हे खूपच सुरक्षित शहर आहे. आम्ही अभिमानाने सांगतो की, रात्री २-३ वाजता महिला बाहेर पडली तरी तिच्यासाठी हे अतिशय सुरक्षित शहर आहे. मला आशा आहे की सैफ लवकरच बरा होईल. त्याच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करत आहे.” (Shahid Kapoor)

‘देवा’चा ट्रेलर रिलीज; बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार?

दमदार टीझर आणि गाण्यांनंतर आज शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. वेगवान कथानक, जबरदस्त ॲक्शन आणि उत्कंठावर्धक दृश्ये ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित ‘देवा’ हा चित्रपट झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित असून, ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Shahid Kapoor)

Title: Shahid Kapoor Reacts to Saif Ali Khan attack

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फुटला; २४ कॅरेट ‘इतक्या’ हजारांच्या उंबरठ्यावर

14 दिवस मध खाल्ल्यास होतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

सैफनंतर शाहरुख खान टार्गेटवर?; ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना संशय

आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचं कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

भाजप आमदाराला पुत्रशोक, लेकाच्या अचानक मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर