शहीद संदीप जाधव अमर रहे, केळगावमध्ये अंत्यसंस्कार

Photo- ANI

औरंगाबाद | पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप जाधव यांच्यावर त्यांच्या औरंगाबादमधील केळगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संदीप जाधव अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. 

शहीद संदीप जाधव यांचं पार्थिव काल औरंगाबादमध्ये आणण्यात आलं होतं. दरम्यान, मुलाच्याच वाढदिवसाच्या दिवशी संदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढवली, त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

संदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या