बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या शहनाजला पाहून तुम्हालाही येईल रडू; पाहा व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता आणि ‘बिग बाॅस’ विजेता सिद्धार्थ शुक्लाने लोकांच्या मनात स्वतःची एक विशेष जागा निर्माण केली होती. कमी वेळेत आणि काळात त्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मात्र दुर्दैवाने वयाच्या 40 व्या वर्षीच सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला त्यामुळे बाॅलिवूड सुन्न पडलं आहे. अशातच अभिनेत्री शहनाज गील सिद्धार्थच्या निधनानंतर प्रथमच लोकांच्या नजरेला आली असून तिला पाहण्यासाठी अनेक लोक वाट पाहत होते.

सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी बिग बाॅस पासूनच लोकांच्या प्रचंड पसंतीस आली होती. एवढंच काय तर लोकांनी या जोडीला ‘सिडनाज’ असं नाव देखील दिलं होतं. मात्र ही जोडी आता परत पहायला मिळणार नसल्याचं दुःख सर्वच चाहते व्यक्त करत आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला पाहण्यासाठी चाहते चिंतेत होते. अशातच तिच्या एका व्हिडीओने चाहत्यांच्या आंगावर काटा आणला आहे.

सिद्धार्थवर अंतिम संस्कार होणार असून त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी शहनाज स्मशानभूमीमध्ये पोचली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिचं दुःख तिला अनावर झालं असून ती हुंदके देत रडताना दिसली आहे. तिच्याकडे पाहून तिला स्वतःला सांभळण्याचं बळ तिच्यात नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडीओने सर्वांच्या मनाला सुन्न केलं आहे. शहनाज आणि सिद्धार्थची जोडी लोकांच्या नेहमीच पसंतीस होती. या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी सगळेच नेहमी उत्सुक असायचे. तसेच ही जोडी नेहमी सर्वांना खळखळून हसवायची. मात्र सिद्धार्थच्या जाण्याने आता ही जोडी पुन्हा कधीच कोणाच्या नजरेस येणार नाही.

पाहा व्हिडीओः 

थोडक्यात बातम्या-

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More