बिहार | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान निकालापूर्वीच भाजपाने महाआघाडीवर निशाणा साधलाय.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी काँग्रेस-आरजेडीवर टीका केलीये. “महाआघाडीच्या लोकांनी अजून थोडावेळ आनंद साजरा करून घ्या. कारण बिहारची जनता त्यांना स्विकार करणार नाहीये,” असं हुसैन म्हणालेत.
शिवाय महाआघाडीकडून लाडू बनवले जात असून, महाआघाडीचे लोकंच ते लाडू खाऊन टाकतील. त्यांना ते लाडू पचणारही नाहीत, अशी टीका केलीये.
हुसैन पुढे म्हणाले, “बिहारमध्ये भाजपा सरकार सत्तेत येईल. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वांना याचं उत्तर मिळेल.”
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!
अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम
कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण जगासाठी मोठी बातमी!
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली, अन्…
बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख