शाहरुख, अनुष्का, कतरिना पुन्हा एकत्र; उद्या सिनेमाची घोषणा

मुंबई | जब तक है जान सिनेमात एकत्र झळकल्यानंतर शाहरुख, अनुष्का आणि कतरिना पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात हे त्रिकुट पहायला मिळणार आहे.

शाहरुख खानने ट्विटवर यासंदर्भात घोषणा केलीय. उद्या संध्याकाळी 5 वाजता या सिनेमाच्या नावाची घोषणा होणार आहे.

शाहरुखने यासंदर्भात ट्विट केले आहेत. तर अनुष्कानंही ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली आहे.