Shahrukh Khan | बॉलीवुडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानच्या हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 21 मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या कोलकाता आणि हैद्राबाद सामन्यादरम्यान शाहरुखची तब्येत अचानकच बिघडली होती.यामुळे त्याला रुग्णालयात दखल करण्यात आलं होतं.
नुकतीच शाहरुखच्या आरोग्याबद्दल केकेआरची को-ओनर अभिनेत्री जुही चावलाने मोठी अपडेट दिली आहे. देशभरात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात देखील उष्णतेच्या लाटा वाहत आहेत. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शाहरुखही झाला हीट वेव्हचा शिकार
कडक उन्हामुळे घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय. या उष्णतेमुळेच शाहरुखची तब्येत अचानकच बिघडली. सनराइजर हैद्राबाद (SRH) आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळला गेला. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख देखील मैदानात पोहोचला होता.
या दरम्यानच कडक उन्हाच्या झळामुळे शाहरुखची तब्येत खालावली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता जुही चावलाने शाहरुखच्या आरोग्याबद्दल माहिती दिली आहे. उपचारानंतर शाहरुखला (Shahrukh Khan) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जुही चावलाने दिली अपडेट
“सध्या शाहरुखची तब्येत एकदम ठीक असून त्याच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिलं जात आहे. आता तो एकदम सुदृढ असून फायनल सामन्यात शाहरुख टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर येऊ शकतो.”, असं जुही चावला म्हणाली आहे.
दरम्यान, शाहरुख खानला (Shahrukh Khan)रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची पत्नी गौरीही रुग्णालयात पोहोचली. शाहरुखची टीम कोलकाता नाइट राइडर्स फायनलमध्ये पोहोचली आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खानच्या टीमची कामगिरी संपूर्ण हंगामात चांगलीच राहिली आहे.
News update – Shahrukh Khan Health Update
महत्त्वाच्या बातम्या-
बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य
बापरे! साड्यांच्या किंमती वाढल्या; मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे
आरसीबीने दिनेश कार्तिकला दिला खास निरोप; भावुक व्हिडिओ व्हायरल