बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिल्लीला कसं विसरु तुम्हीच सांगा’; किंग खान ‘या’ कारणामुळं झालाय भावुक

नवी दिल्ली | किंग खानला बॉलिवुडचा अनभिज्ञ सम्राट म्हटलं जातं. मुंबई या मायानगरीत प्रत्येकजण नशिब आजमावायला येतं. शाहरूखही यापैकीच एक. ‘स्ट्रगलर ते किंग खान’ असा प्रवास करणारा शाहरुख मुंबईनं मला घडवल्याचं नेहमीच मान्य करतो. मात्र मुंबईपेक्षा राजधानी दिल्लीवjरील त्याचं प्रेम जरा जास्त आहे आणि त्यासाठीच कारणही तितकंच महत्वाचं आहे.

सध्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाच्या चित्रिकरणाचं काम सुरु आहे. शाहरुखनं या चित्रपटातून स्वत:साठी वेळ काढत दिल्लीचा दौरा केला आहे. दिल्लीत शाहरुख आपल्या आईवडीलांच्या कबरीला भेट द्यायला गेल्याचं नुकत्याचं एका व्हायरल झालेल्या फोटोतून समोर आलं आहे. व्हायरल भय्या यांनी शाहरुखचा दिल्लीतील भावविवश फोटो आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे.

शाहरुखनं याआधीही हितगुज साधताना सांगितलं होतं की, दिल्लीला जेव्हा केव्हा मी जातो तेव्हा मला माझे आईवडील नेहमी जवळ असल्याचा भास होत राहतो. मुंबईत बरेच दिवस असल्यानं तु पक्का मुंबईचा माणूस झाला आहेस. असं लोक म्हणतात पण आता माझे आईवडीलांच्या आठवणी असल्यानं मी दिल्लीला कधीही सोडू शकणार नाही, असं मी लोकांना कसंं सांगू

दरम्यान शाहरुखचे वडील पेशाने अभियंता होते. मात्र शाहरुख कॉलेजच्या काळात असतानाच त्यांचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं मृत्यू झाला. शाहरुख एक धक्का पचवतोय ना तोच त्याच्या आईचाही 1990 साली मृत्यू झाला. शाहरुखनं यानंतर बॉलिवुडमध्ये नशीब आजमविण्याचा निर्णय घेतला अन् तो बॉलिवुडचा अनभिज्ञ सम्राट ठरला. मात्र त्याची दिल्लीशी असलेली नाळ अद्यापही तुटलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More