Loading...

“मुलीच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला मीच मदत करतो”

मुंबई | सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलेसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.

शाहरुखने डेव्हिड लेटरमन यांच्या ‘माय नेक्स्ट गेस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याला सुहानाच्या प्रियकराविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.

Loading...

माझ्या मुलांबरोबर माझे मैत्रीचे संबंध आहेत.पण मुलीबरोबर तिच्या प्रियकराबाबत चर्चा करणं मला फारसं आवडत नाही. कारण सुहान फार लहान आहे. हे वय तिचं शिकण्याचं आहे. त्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या आयुष्यात एखादा प्रियकर यावा असे मला वाटत नाही, असं शाहरूख खान म्हणाला.

दरम्यान, लाडक्या मुलीच्या हट्टापुढं माझं काही चालत नाही. उलट प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करताना मला तिची मदत करावी लागते, अशा शब्दात शाहरुखने सुहानाच्या प्रियकराबाबत आपलं मत व्यक्त केलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

 

Loading...