बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला

मुंबई | बॉलिवूडचा किंग खान गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अगदी शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुंबईतील ‘मन्नत’ (Mannat) बंगलाही पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही. शेकडो चाहते रोज शाहरूखच्या मन्नत बंगल्याबाहेर येऊन सेल्फी आणि फोटो काढतात.

शाहरूख खानचा हाच मन्नत बंगला सध्या ट्विटरवर (Twitter) चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे. शाहरूखचा मन्नत बंगला अचानक ट्विटरवर ट्रेंड होण्यामागचं कारण काय? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. शाहरूखचा बंगला ट्रेंड होण्यामागचं कारणही अगदी खास आहे.

शाहरूखच्या बंगल्याची नवी नेमप्लेट मन्नत बंगला ट्रेंड होण्यामाचं कारण आहे. काही चाहत्यांनी शाहरूखच्या बंगल्याच्या बदलल्या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि यामुळेच सध्या मन्नत ट्विटरवर ट्रेंड होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शाहरूखच्या मन्नत बंगल्याच्या नव्या नेमप्लेटचा फोटो शाहरूखच्या अनेक फॅन पेज वर देखील शेअर केला जात आहे. ‘मन्नत.. द लँड्स एंड’ असं शाहरूखच्या बंगल्याच्या नव्या नेमप्लेटवर लिहिलं आहे. एका पोस्टनुसार शाहरूखने चौथ्यांदा ही नेमप्लेट बदलली असून नव्या नेमप्लेटचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हा आठवडा महत्त्वाचा

‘राष्ट्रपती राजवट लावा…’; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पंतप्रधान मोदींनी घेतला महत्त्वाचा निर्णय

“बाजारात नवी ऑफर, ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा”

“…आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More