बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात CAA, NCR, NPR लागू झालं तर गांधी हरतील आणि जीना जिंकतील- शशी थरूर

नवी दिल्ली |  देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय लोकसख्या सुची (एनपीआर) लागू झाले तर तो महात्मा गांधींचा पराभव असेल आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहमद अली जीना यांचा विजय असेल, असं काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

जयपूर लिट्रेचर ऑफ फेस्टिवल या कार्यक्रमात बोलताना थरुर यांनी हे वक्तव्य केलं आहे. सीएए, एनपीआर, एनआरसी या मुद्द्यांवरुन त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप देश तोडण्याचं काम करत आहे, असा आरोप थरुर यांनी केला आहे.

भारतातील हिंदू मुस्लीमांना कधीच स्वीकारणार नाहीत, असं जीना म्हणाले होते. तर महात्मा गांधींनी भारतात सर्व धर्मियांसाठी समानतेचा संदेश दिला होता. भाजप गांधीच्या याच उद्देशाला नख लावत आहे, असं थरुर म्हणाले आहेत.

दरम्यान, सीएए, एनसीआर, एनपीआर यावरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. अनेक लोक याविरोधात निदर्शने करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीसांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की!

इतिहास अमित शहांसारख्या जनावरावर थुंकेल; अनुराग कश्यपची जहरी टीका

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधींची नियुक्ती?

रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत?, पाहा नासानं काढलेला खराखुरा फोटो

शरद पवार म्हणजे देव माणूस- इंदुरीकर महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More