Top News

आरक्षणासाठी पहिली गाडी शाहू महाराजांची; त्यानंतर हजारो वाहनं मंत्रालयावर धडकणार

कोल्हापूर | आरक्षणासाठी मराठा समाज मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहे. 4 सप्टेंबरला मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.

आयोग सरकारच्या दबावाने अहवाल देण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे आता थेट मुंबईत धडक देणार असून, पहिली गाडी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची असेल, त्यानंतर बाकीच्या वाहनांचा काफिला मंत्रालयावर धडक देणार आहे, असंही त्यांनी सांगीतलं.

दरम्यान, लोकप्रतिनिधींनीही आपापले पक्ष बाजूला ठेवून या आंदोलनात पुढे असले पाहिजे. त्याशिवाय जास्तीत जास्त सकल मराठा बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर

-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर

-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!

-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या