बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतात 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील”

कोलकाता | देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यापैकी सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्येे विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशात तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेख आलम यांनी भारताचं विभाजन करण्याची भाषा केली आहे. यामुळे आलम यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. टीएमसी समर्थकांना संबोधित करताना शेख आलम यांनी भारतातील 30 टक्के मुस्लीम लोकसंख्या एकत्र आली तर चार पाकिस्तान तयार होतील, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते बिरभूममध्ये बोलत होते.

आपण फक्त लोकसंख्येच्या 30 टक्के आहोत आणि ते 70 टक्के आहेत. 70 टक्के समर्थनासह ते सत्तेत येतील, त्यांना लाज वाटली पाहिजे. जर आपली मुस्लीम लोकसंख्या एका बाजूला गेली तर आपण चार नवे पाकिस्तान तयार करु शकतो. त्यानंतर 70 टक्के लोकसंख्या कुठे जाईल?, असं शेक आलम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!

“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”

संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स

“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”

देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More