बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी; मालेगावमध्ये नवा पॅटर्न!

नाशिक | मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेचा एक नवा पॅटर्न पाहायला मिळाला आहे. शिवसेना – काँग्रेस आणि भाजपनं हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे.  तर उपमहापौर पदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे.

मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीकडून ताहेरा शेख यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. ताहेरा शेख यांनी महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांचा 21 मतांनी पराभव केला.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपनं काँग्रेस-शिवसेना आघाडीला साथ दिली. ताहेरा शेख यांना 51 तर शान-ए-हिंद निहाल अहमद यांना 32 मतं मिळाली.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा सरकार पॅटर्न पाहिला. मात्र मालेगावमध्ये शिवसेना-काँग्रेस-भाजपचं नव समीकरण पाहायला मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More