Top News कोल्हापूर महाराष्ट्र

…तर कोल्हापुरी हिसका दाखवू, ‘या’ भाजप नेत्याला स्वाभिमानीचा इशारा

Photo Courtesy- Facebook/Raju Shetti and Pasha Patel

कोल्हापूर | माजी विधानपरिषद सदस्य पाशा पटेल या़ंच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश आडके यांनी कडाडून टीका केली. भाजपा नेत्यांची हुजरेगिरी करुन पाशा पटेल यांनी पदं मिळवली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावर टीका करून स्वतःचा राजकीय फायदा बघणाऱ्या पाशा पटेल यांनी शेतकरी हिताचे सल्ले देऊ नयेत. यापुढे राजू शेट्टींवर टीका कराल तर कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा देखील आडके यांनी यावेळी दिला.

राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष असताना ऊसाच्या उत्पन्नाचा खर्च कमी करून पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. याउलट राजू शेट्टी यांनी सत्तेचा हव्यास न ठेवता रस्त्यावर उतरून शेतकरी प्रश्नांविरोधातील लढा सुरू ठेवला आहे, असं आडके म्हणाले.

दरम्यान, सत्तेची फळं चाखायची असती तर राजू शेट्टी यांनी सुद्धा भाजपाला समर्थन दिले असते. मात्र, शेतकरी कायद्यांविरोधात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.

पटेल यांच्या जीवनाचा उद्देश शेतकरी प्रश्न सोडवणे हा असेल तर त्यांनी आंदोलन सोडून भाजपमध्ये प्रवेश का घेतला? असा सवाल देखील यावेळी शैलेश आडके यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल

भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

“नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?”

सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या