TMKOC फेम शैलेश लोढांनी संन्यास घेतला?

नवी दिल्ली | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक सुप्रसिद्ध फेमस पात्र म्हणजे तारक मेहता होय. हल्ली ही मालिका अनेक कारणांमुळे चर्चेत असते. यातील तारक मेहताचं पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढांनी काही कारणास्तव मालिका सोडली. आता मात्र त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला का असा प्रश्न विचारला जात आहे.

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरुन काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी त्याचा जो लूक केला आहे त्यामुळं त्यांनी संन्यास घेतल्याचं वाटत आहे. या फोटोत लोढांनी पिवळ्या रंगाचं धोतर आणि उपरण घातलं आहे. त्याच्या गळ्यात फुलांची माळ आहे. कपाळाला भस्म लावलं आहे.

लोढा ज्या ठिकाणी बसले आहेत ती जागा एक मंदिर दिसत आहे. अशा स्वरुपाचा फोटो शेयर करत ‘हमको मन की शक्ती देना, मन विजय करे’ असं कॅप्शन दिलं आहे. कंमेट सेक्शनमध्ये चाहत्यांनी जय श्री राम, नम शिवाय अशी कमेंट केली आहे. काहीनीं शैलेश लोढा मालिकेत परत येणार असल्याचं म्हणलं आहे.

दरम्यान, शैलेश लोढांनी मालिका सोडल्यानंतर अनेक गोष्टीची चर्चा सुरु होती. तारक मेहताच्या निर्मात्यांनी शैलेश लोढा यांची काही महिन्यांची फी दिली नसल्याचं सांगितलं जात होत. यावर निर्मात्यांनी त्याचा मुद्दा मांडला आहे. शैलेश लोढांनी काही कागदपत्रावर सही केली नाही, त्यामुळे त्यांना पैसे दिलं नसल्याचं स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या