तारक मेहताच्या एका भागासाठी शैलेश लोढा यांना मिळायचे ‘इतके’ लाख, मानधन ऐकून थक्क व्हाल
मुंबई | ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले शैलेश लोढा (Shailesh Lodha) अर्थात सर्वांचे लाडके तारक मेहता गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. शैलेश लोढा तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सोडणार असल्याचं समोर आल्यानंतर सर्वच चाहत्यांना धक्का बसला.
देशातील घराघरात पाहिली जाणारी तारक मेहता का उलटा चष्मा मालिका 2008 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एक ना एक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मालिकेत तारक मेहताचं पात्र साकारणारे शैलेश लोढा मालिकेच्या एका एपिसोडसाठी भलंमोठं मानधन घ्यायचे. एका मीडिया रिपोर्टनुसार शैलेश लोढा यांचं एका भागासाठीचं मानधन हे तब्बल 1 लाख रूपये होतं.
दरम्यान, तारक मेहता म्हणून प्रेक्षकांचं 14 वर्षे मनोरंजन केल्यानंतर शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम ठोकल्याचं म्हटलं जात आहे. दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे व तसेच मालिकेच्या करारामुळे नाराज होऊन शैलेश यांनी ही मालिका सोडल्याचं वृत्त आहे. शैलेश लोढा यांचा मोठा चाहतावर्ग असून ते अभिनेत्यासह एक उत्तम कवी व लेखक देखील आहेत.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मन उडु उडु झालं! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ह्रता आणि प्रतीकचा लग्न सोहळा, पाहा फोटो
विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे
सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅस पुन्हा महागला
राज कुंद्राला मोठा झटका, पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता
Comments are closed.