नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली | RBI च्या गव्हर्नरपदावर नियु्क्त झालेले शक्तिकांत दास भ्रष्टाचारात सहभागी आहेत, असा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ते ‘ANI’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

शक्तिकांत दास यांची गव्हर्नर पदावर नेमणूक करणं चुकीचा निर्णय आहे, असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केलेल्या भ्रष्टाचारात शक्तिकांत दास सहभागी होते. पी चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता, असंही स्वामींनी म्हटलं आहे.

दरम्यान, शक्तिकांत दास यांची नेमणूक का केली गेली हे मला माहीत नाही, मात्र या निर्णयाविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र लिहणार आहे, असं स्वामी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या