बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मत मागायला याल, तेव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात चांगलंच नुकसान झालं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्या परिस्थितीची पाहणी करायला गेला असता. त्यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एक महिलेला दमदाटी केली. या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. कोकणी माणूस येणाऱ्या निवडणूकीमध्ये आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात शालिनी ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.

भास्कर जाधाव आज त्या अगतिक महिलेवर जो हात उगारलात ना?, तोच हात जोडून पाच वर्षांनी मत मागायला याल. तेव्हा हीच कोकणी माणसं तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना. एक महिला त्यांच्यासमोर आली आणि तिने आपली व्यथा सांगायला सुरूवात केली. पुराचं पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे सगळं वाहून गेलं. आम्हाला मदत करा, मदत केल्याशिवाय इथून जाऊ नका, असं ती महिला म्हणत होती. त्यावेळी त्या महिलेवर भास्कर जाधवांनी आवाज चढवत ‘उद्या भेट’ असं सांगितलं. तसेच त्या महिलेच्या मुलाला ‘तुझ्या आईला समजाव’, असंही जाधव म्हणाले. यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More