बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”

मुंबई | कोरोनाकाळात प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने अनेकांना मदत केली होती. त्यासोबतच त्याने अनेक नागरिकांना त्यांच्या कठीण काळात मदत केली आहे. यामध्ये बेरोजगार तरूणांना नोकरी मिळवून देणं, शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट आणि काहींना निवाऱ्यासाठी घरंही बांधून दिली आहेत. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही तो हिरोच ठरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याचाच धागा पकडत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता. पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत सोनू सूदवर टीका केली आहे. याआधी मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही बॉलिवुडच्या कलाकारांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर भाष्य करत त्याच्यावर खोचक सवाल केला आहे. त्यामुळे आता सोनू सूद यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पाण्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”

सर्वत्र उत्तर प्रदेशचाच बोलबाला, देशातील 24 बोगस विद्यापीठांपैकी 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशची

‘जोधा अकबर’मधील ‘या’ अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More