“अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना माजी आमदार शिलिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणूनच ईडीकडून अद्याप एकदाही अजितदादांची चौकशी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांना 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलवते, पण अजित पवार यांना 1400 कोटींच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात का बोलवत नाही? अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणून त्यांना सावली भेटत आहे, असं शालिनीताई म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-