बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

मुंबई | राज्य सहकारी बँके घोटाळ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावर जरंडेश्ववर साखर कारखान्याच्या माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना अजित पवारांवर निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशिर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी 34 लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचं शालिनीताई पाटील म्हणाल्या.

सरकारची आमच्या कर्जाला हमी होती त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच, असंही शालिनीताई म्हणाल्या. जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव झाला होता त्यावेळी तो घाडगे यांनी खरेदी केला होता. या लिलाव प्रक्रियेला शालिनीताई यांनी न्यायालात आव्हान दिलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे म्हणाले…

महाराष्ट्रात ईडीच्या मार्फत सत्तांतर करण्याचा डाव???; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

‘अजितदादा आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी…’; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More