Shambhuraj Desai | राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे. चौथ्या टप्प्याचं मतदान नुकतंच पार पडलं आहे. आता अनेकांचं लक्ष हे पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे लागलं आहे. मात्र अशातच आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या प्रतिक्रियेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.
शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटवर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केलीआहे. या लोकसभा निवडणुकीत ते दिसून येईलच, असा दावा आता शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) केला आहे. आम्ही त्यांची आता नावे घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
“4 जून पर्यंत महायुतीत लोढा येईल”
त्या गटातील नेत्यांनी आम्हाला आतून मदत केली आहे. यामुळे आता 4 जूनपर्यंत महायुतीत लोढा येईल, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. त्यावर आम्ही नावे घेणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. निकालानंतर कळेलच असं ते म्हणाले आहेत. शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) दाव्याने राज्याच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता वर्तवली आहे.
एवढंच नाहीतर आगामी निवडणुकांआधी महाविकास आघाडीचे काही नेते देखील महायुतीत येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये महायुतीला चांगलं वातावरण असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. तसेच लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त सभा आहे. यामुळे त्याचा देखील प्रभाव पडणार असल्याचं ते म्हणाले. तसेच राज्यात महायुती ही 45 जागांवर विजयी मिळवणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
नुकतंच तिसऱ्या टप्प्याचं लोकसभा मतदान झालं. सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटातून शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपकडून उदयनराजे यांच्यात टफ फाईट पाहायला मिळाली. फक्त आता महाराष्ट्र निकालाची वाट पाहत आहे. दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. मात्र शंभूराज देसाईंनी त्या गटातील नेत्यांनी महायुतीला मदत केली असल्याचं वक्तव्य केलं. यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरं तर जावं लागणार नाही ना?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
News Title – Shambhuraj Desai Big Satatement In Maharashtra Politics
महत्त्वाच्या बातम्या
“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?”; बड्या नेत्याने थेट फार्म्युलाच सांगितला
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”
बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!
“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”
होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!