बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राठोड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मात्र संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्यानं त्यांच्या समर्थकांनी तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिथं झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र या प्रकरणात संजय राठोडांना क्लीनचिट दिली आहे. संजय राठोड यांनी तिथं गर्दी केली नाही. ते तिथं देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणाऱ्यांवर चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. तिथं गर्दी करण्यामागे संजय राठोड आणि मंदिरातील महंत जबाबदार नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत गर्दी न करता साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रथमच बोलणार असल्यानं सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोहरादेवी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणात हजारो लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून शरद पवार नाराज असल्याची चर्चा  होत होती, मात्र संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शरद पवार कोणीही नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!

“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”

“या कारणामुळेच ‘RSS’च्या चेल्यांनी सरदार पटेलांचं नाव बदललं”

नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल

उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More