कोल्हापूर | देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही, असं म्हणत गृह राज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.
आमच्यावर कितीही टीका झाल्या तरी शिवसेना ही आपल्या विचारांवर ठाम आहे. केवळ महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये एकमेकांमध्ये पूर्ण समन्वय आहे. निधी वाटपाबाबत कसलीही नाराजी नाही. काही विभागांना अधिक निधी मिळावा अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही, असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असंही शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे
“राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”
कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता- उद्धव ठाकरे
सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे
डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ