बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर राजकारण सोडून घरी बसेन’; शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य

सातारा | शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई हे गेल्या दहा दिवसांच्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर साताऱ्यात गेले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली असं ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेेनेच्या तिकीटावर निवडून आलेले 40 आमदार शिवसेना सोडून बाहेर पडले. त्यांना आणि त्यांच्या वक्तव्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली. मी त्यांना महत्व देत नाही, असं शंभुराज देसाई म्हणालेत.

शरद पवार यांच्यावरसुद्धा त्यांनी टीका केली. शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे टिकेल असं म्हटलं होतं. पण अडीच वर्षात हे सरकार कोसळलं. आता शरद पवार म्हणत आहेत. मध्यावधी निवडणूका लागणार, पण तसंही होणार नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले. प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याच्या आरोपावर बोलताना त्यांच्याकडे पुरावा आहे का?, अशी विचारणा केली. पैसे दिल्याचे पुरावे दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन. आम्ही शिवसेनेत आहोत बाळासाहेब ठाकरेंची आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे नेणार आहोत, असं यावेळी देसाई म्हणालेत.

घोडा मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षांनंतर निवडणूका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा आम्हाला शब्द दिला आहे आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

“कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू”

अभिनेत्री रश्मिकाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाली होती ‘एवढी’ रक्कम!

धक्कादायक! कुत्रा भुंकल्यामुळे मालकासह तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

“संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा”

‘भारतातील, बेरोजगारी, महागाईला औरंगजेबच जबाबदार असेल’; ओवैसींचा मोदींना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More