महाराष्ट्र मुंबई

“मोदी सरकारने हे बजेट सामान्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी आणलं”

File Photo

मुंबई | बळीराजाला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद असायला हवी होती. मात्र मोदी सरकारने सामान्यांसाठी हे बजेट आणलं नाही तर हे बजेट उद्योगपतींसाठी आणलंय, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या तर तोंडाला पाने पुसण्याचं काम केंद्राने केलं आहे. मुंबई-महाराष्ट्राला तर काही देखील मिळालं नाही, असं शंभुराज देसाई देसाई म्हणाले.

शेतकऱ्यांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय केंद्राने घेतलेला नाही. शेतकरी कर्जामध्ये बुडालेला आहे. त्या शेतकऱ्याला बुडालेल्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी कुठलंही मोठं पॅकेज या सरकारने दिलेलं नाही, असं देसाई म्हणाले.

केवळ काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीयदृष्ट्या मांडलेल्या हा अर्थसंकल्प असल्याची टीका देसाई यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही- निलेश राणे

मुंबईसह राज्यातील महिलांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा!

पुण्यातील ‘या’ तरुणीने तब्बल 16 तरुणांना अडकवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज

‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या