महाराष्ट्र सांगली

“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”

सांगली | अनेक नेत्यांना शिवसेनेत यायचं आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, असं राज्याचे गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ होत आहे. शांत आणि संयमी स्वभावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभर राज्याचा कारभार हाताळला आहे. त्यामुळेच अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारने राज्यात नाईट संचारबंदी लागू केली आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती. याला शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय.

दरेकरांनी चार दिवसांच्या वर्तमानपत्रातील बातम्या बघायला हव्या होत्या. यूरोपीयन देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. इतर राष्ट्रांमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. या नव्या कोरोनाचा फैलावण्याचा वेग अधिक असून हा कोरोना जीवघेणा आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे कोणताही कहर नाही. जनतेच्या संरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता!

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

“काँग्रेसमध्ये कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल यासाठी मोठा गट तयार असतो”

भाजपाला टीकांचा ‘भारतरत्न’ द्यायला पाहिजे- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या