16 जानेवारीला शौर्यपीठ तुळापूरला श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

16 जानेवारीला शौर्यपीठ तुळापूरला श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

तुळापूर |   छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त येणाऱ्या 16 जानेवारी 2019 ला शौर्यपीठ तुळापूर येथे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोहळ्याचं हे 6 वं वर्ष आहे.

या वर्षीच्या संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास श्रीमंत विश्वजीत नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार नितेश राणे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, राहुल पोकळे,विकास पासलकर यांसह तुळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य उपस्थित राहणार  आहेत.

सकाळी 9 वाजल्यापासून या सोहळ्याची सुरूवात होणार असून पालखी सोहळ्याने त्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर सकाळी 10 ते 10.30 या दरम्यान राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. 

दरवर्षीप्रमाणे शंभूराजे पुरस्कारांचं वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हे पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणार आहेत. कला विभागासाठी दिला जाणारा पुरस्कार स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे यांना देण्यात येणार आहे.

या भव्य सोहळ्यासाठी शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन शंभूराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजक शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.

Google+ Linkedin