Top News देश

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी ममतादीदींना सुनावलं

कोलकाता | पश्चिम बंगालच्या पोलिसांवर भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यात महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

खरदाह पोलीस स्टेशनमध्ये विरोध नोंदवण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिलांवरही लाठीचार्ज केला. एक महिला राज्याची मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून महिलावर होणारा असंवेदनशील आणि अमानवीय व्यवहार पाहून काय म्हणावं. ‘शर्म करो ममताजी, जनता मांफ नहीं करेगी’, अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी ममतांना सुनावलं

 

थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या