मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली

नवी दिल्ली | मला तुमची लाज वाटते मिस्टर प्रेसिडेंट ऑफ पॉलिटीकल पार्टी, असं ट्वीट करत दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करताना शहांच्या वक्तव्याची बातमी शेअर केली आहे.

तुम्ही किती अविचारी आहात. तुमची पातळी किती खालावली आहे. म्हणून मला तुमची लाज वाटते असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधींनी लग्न केलं नसल्याने प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. भाजपमध्ये एक चहावाला पंतप्रधान झाला म्हणजे काँग्रेसमध्ये तसं कधीच होणार नाही, असं म्हणत शहांनी गांधी घराण्यावर तोफ डागली होती.

दरम्यान, काँग्रेसमधील कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनन्याचा विचार करु शकतो का?, असा सवाल शहांनी उपस्थित केला होता.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

-कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

Google+ Linkedin