बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये हाणामारी

मुंबई | शिंदे गटाच्या बंडाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. राज्यात सत्तांतरानंतर फडणवीस-शिंदेंचं सरकार आलं.  फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलेच पावसाळी अधिवेशन होत आहे.

या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आंदोलनावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आमने-सामने आले. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांनी आधी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. महाराष्ट्रात सामान्य जनतेच्या अनेक अडचणी आहेत. त्यावर उपाययोजना करायच्या सोडून नेतेमंडळींचं असं लाजिरवाणं कृत्य सुरू आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More