बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लज्जास्पद, दु:खद आणि पुर्णपणे अन्यायकारक निर्णय”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच फेसबुक लाईव्हवरून कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बाॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत या निर्णयावर नाराज असल्याचं समजत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिची नाराजी व्यक्त केली आहे.

कंगणाने पोस्टमध्ये मोदी सरकारच्या निर्णयाला लज्जास्पद, दु:खद आणि पुर्णपणे अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय “जर रस्त्यावरील लोक कायदे बनवायला लागले ना की पार्लमेंटमधून निवडून दिलेलं सरकार, तर हे राष्ट्र नक्कीच जिहादी राष्ट्र आहे, असं म्हणायला लागेल.” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय “कंगणाने पोस्टमध्ये ज्या लोकांना हेच हवं होत, त्याचं अभिनंदन,” असंही म्हटलं आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाने देशातील शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून 3 कृषी कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

देशभरातून या निर्णयाचं स्वागत केलं जात असताना कंगणा रनौतने मात्र, सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत शेतकऱ्यांवर निशाणा साधला आहे. कंगणा नुकतीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. 1947 मध्ये देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर 2014 नंतर देशाला खरं स्वांतत्र्य मिळालं आहे, असं वक्तव्य कंगणाने केलं होत. आता पुन्हा तिने केलेल्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Photo Courtesy | Instagram\ kangana ranaut

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; ‘या’ दिग्दर्शकाला करतेय डेट

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

“मी पुन्हा येत आहे, चला काहीतरी तूफानी करूयात”

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More